जगातल्या प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा संदर्भ असतो, निसर्ग, प्रकाश माणसाची वागणूक अगदी कलात्मकता आणि भाषा यांना सुद्धा. हा संदर्भ कळला की जग सुंदर करायची उमेद वाढते, आणि आत्मविश्वास देखील. हा शोध घेत शिकावं असं ज्यांना वाटतं त्या सगळ्यांसाठी हे द्वैमासिक आहे. विद्यार्थ्यांसाठी,त्यांच्या शिक्षकांसाठी, आणि प्रसंगी शिक्षकाची भूमिका निभावणार्या पालकांसाठीही.