News not found!

संवाद

जुलै २०१६

Magazine Cover

शिक्षणक्षेत्रातील कसदार अनुभव असलेल्या लोकांकडून आपल्याला दृष्टी मिळावी, शिकायला मिळावे, आपल्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता यावी, आपल्याच गटातील अनेकांच्या अनुभवांमधून शिकायला मिळावे, देवाणघेवाण-वादविवाद-चर्चा यातून आपण अधिक समृद्ध व्हावे. यासाठी अॅक्टिव्ह टिचर्स फोरमतर्फे 2014 पासून शिक्षण संमेलन आयोजित केले जाते.
यंदाचे संमेलन 8 आणि 9 मे 2016 रोजी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लबच्या अत्यंत रमणीय परिसरात संपन्न झाले. राज्यभरातून आलेले उत्साही, विचारी आणि प्रयोगशील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ, शिक्षक-प्रशिक्षक अशा मित्र-मैत्रीणींचा मेळाच तिथे जमला होता. हा अंक या शिक्षण संमेलनात झालेल्या सत्रांवर आधारित आहे. RTE आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती या विषयावरील गीता महाशब्दे, प्रल्हाद काठोले आणि राहुल गवारे यांचे लेख तसेच ‘भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या डॉ. विवेक माँटेरोंच्या सत्रावरील लेख जागेअभावी या अंकात घेऊ शकलो नाही. ते पुढील अंकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील.

मे २०१६

Magazine Cover

शिक्षकांच्या अनेक कामांपैकी एक महत्त्वाचे काम संवादकर्त्याचे असते. मुलांशी प्रभावीरीतीने संवाद साधण्यासाठी विविध नाट्य-तंत्रांचे प्रशिक्षण क्वेस्टच्या ‘तारपा’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाते. यात प्रभावी अभिवाचन, बालसाहित्याचे नाट्य-रुपांतर, बाहुली-नाटक, मुखवटा-नाटक असे विविध उपक्रम शिक्षकांना शिकवले जातात. वर्गात शिकवताना या तंत्रांचा मोठा फायदा होतो.

‘कॉम्पुटर’ लॅब सुरू झाली असती...

‘‘सर, काल आपल्या गावची यात्रा व्हती. तुम्ही कामून आले नव्हते यात्रेला?’’ मोटरसायकलवरून खाली उतरून शाळेच्या आवारात पाय ठेवतो न ठेवतो तोच मुलांनी मला घेरलं. मला मुलांच्या प्रश्नांचं काहीसं नवल वाटलं. कारण याच गावात मी लहानाचा मोठा झालेलो. गावात यात्रा फार जोशात, जोरात साजरी केली जाते असं काही नाही! मुलं मात्र मला माझ्या ‘गैरहजेरीमागचं’ कारण विचारत होती.

बदलत गेलेलं बोलणं

Magazine Cover

‘व्यक्त’ होणं ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. भोवतालची परिस्थिती, घडणार्‍या घटना, भेटणारी माणसं, अनुभवत असलेले सुखदुःखाचे क्षण यावर मनात प्रतिक्रिया उमटतच असतात. त्या कुणाबरोबर तरी, कुणासमोर तरी मोकळेपणी मांडाव्या, समोरच्याची प्रतिक्रिया समजून घ्यावी, त्यावर आपलं मत नोंदवावं, कुणाला काही तरी सुचवावं, असा परस्पर ‘संवाद’ परस्परात अखंड चालूच असतो. न बोलता घुमेपणी एकलकोंडे बसून राहणार्‍यांच्या ‘मानसिकते’ची शंका घेतली जाते, इतकं ‘बोलणं’ हा आपल्या दैनंदिनीचा अपरिहार्य भाग आहे.

प्रेमाच्या पाच भाषा

Magazine Cover

जगण्यासाठी माणसाच्या तीन मूलभूत गरजा पूर्ण होणं आवश्यक असतं, अन्न, वस्त्र आणि निवारा. आपल्या अस्तित्वाची जाणीव झालेल्या माणसाला जगण्यासाठी आणखी एका गोष्टीची अनिवार्य गरज असते, ती म्हणजे प्रेमाची.

मूल हवे - अट्टहास हवाच का? ( आई बाप व्हायचंय? लेखांक - ६ )

Magazine Cover

मूल हवंसं वाटणं ही नैसर्गिक व मानवी गोष्ट. पण मूल होत नसेल, तर तो जीवनमरणाचा प्रश्न का व्हावा? तंत्रज्ञान तर कोणत्याही प्रश्नाची उत्तरं काढायला धावत राहतं, पण त्या उत्तराबरोबर आपण कुठेकुठे वाहावत चाललोय, याचं भान ठेवायला नको का?

सुनंदाची myomectomy झाली होती. तिच्या गर्भाशयात मोठ्या गाठी होत्या. त्या काढून टाकणं आवश्यक होतं. गर्भधारणा होण्यासाठी त्या अडचणीच्या ठरतील अशी शक्यता होती. त्यामुळे त्याचं ऑपरेशन - myomectomy झालं होतं. त्यानंतर सहा महिने थांबून परत मूल होण्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते. पण दोन वर्षं झाली तरी गर्भधारणा होत नव्हती. माझ्याकडे आली तेव्हा सुनंदाच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. तिचं वय ३१ वर्षं होतं. ऑपरेशन होऊन २ वर्षं होऊन गेली होती. Myomectomy झाल्यावर दिवस रहायला कधी कधी अडीच-तीन वर्षं लागतात. मी तिला तपासणीसाठी टेबलावर झोपवलं - आणि माझ्या लक्षात आलं - तिच्या गाठी परत वाढल्या आहेत.

बीजं तिथंच रुजली होती (माझं काम माझं पालकपण - लेखांक-२)

Magazine Cover

विद्यार्थी साहाय्यक समिती, फ्रेंड्स ऑफ फ्रान्स आणि वनस्थळी या तीनही संस्थांच्या कामामागचं बळ असलेल्या निर्मलाताईंना ‘त्रिदल, पुणे’ या संस्थेचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच मिळाला. या कामांबरोबर त्यांनी पालकपणाची सांगड कशी घातली, ते या लेखात उलगडलं आहे.

निम्न आर्थिक गटातल्या, खेड्यातून येणार्याम विद्यार्थ्यांचा राहण्या-जेवण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम विद्यार्थी साहाय्यक समिती करते. फ्रेंडस् ऑफ फ्रान्स या संस्थेतर्फे भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान सर्वसामान्य माणसांमध्ये संपर्क, मैत्री व्हावी आणि त्यांनी एकमेकांची संस्कृती समजावून घ्यावी यासाठी प्रयत्न केले जातात. वनस्थळी ह्या संस्थेतर्फे छोट्या गावातल्या महिलांना बालशिक्षणासाठी प्रशिक्षणं दिली जातात. त्यातून गावपातळीवरचा शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन तयार होतो. शिवाय महिलांचा आत्मविश्वास वाढतो, त्या समाजातला एक महत्त्वाचा घटक बनतात.