'लहानपण देगा देवा' असे वाक्य मोठ्या आशेने म्हणणाऱ्या मोठ्यांना आपल्या लहानग्यांचा हेवा वाटत असतो. पण कधी कधी लहान मुलांच्या वागण्याने हैराण झाल्यामुळे वैतागही वाटतो. हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा, विचित्र सवयी, टीव्ही-मोबाईलचे वेड, आरडाओरडा, मारामाऱ्या, या आणि अश्या अनेक वर्तनसमस्या आणि त्यातून उद्भवणारे नाना प्रश्न सोडवताना पालकांच्या अगदी नाकी नऊ येतात. सगळ्या सोयीसुविधा पुरवूनही ही मुले अशी का वागतात, हेच आई -बाबांना समजत नाही.
खरेच, 'मुले अशी का वागतात?' या प्रश्नाचे एकच अचूक उत्तर नसून अनेक उत्तरे आहेत! (की शक्यता म्हणावे ??)