News not found!
चर्चा आणि विचारांती सध्याच्या खेळघराच्या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी योजना आखल्या, तसेच काही नवी कामे सुरू करायचेही ठरवले.
आम्ही तीन नवे प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. तिन्ही दिशा आम्हाला पूर्णपणे नवीन होत्या.
- नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून बाहेरच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण
- शालाबाह्य मुलांची व पालकांची शाळेत जाण्याची मानसिकता तयार करणं
- युवक प्रकल्प (शैक्षणिक मदत आणि जाणिवांचा विकास व युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजविणे.)
खेळघराचं काम मुलांबरोबरचं, त्यामुळे मोठ्यांच्या प्रशिक्षणाचं काम हा वेगळाच आयाम होता. शाळेत जाऊ न शकणार्या मुलांचे प्रश्न हे शाळेत जाऊन खेळघरात येणार्या मुलांच्या प्रश्नांपेक्षा अधिक गंभीर नि वेगळेही आहेत याची जाणीव होती. खेळघरातून मोठ्या झालेल्या तरुणांबरोबरचं काम जरी त्यामानानं सोपं असलं तरी वस्तीतल्या खेळघराबाहेरच्या मुलांबरोबरचं काम आव्हानात्मक होतं.