News not found!
खेळघराचं काम करताना आम्हाला मिळालेल्या अनुभवांचा, आम्ही आत्मसात केलेल्या गोष्टींचा लाभ इतरांनाही मिळावा असं वाटतं. खेळघरासारखं एखादं काम आपल्या परिसरात सुरू करण्याची इच्छा असणा-या किंवा प्रत्यक्षात करत असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनी जरूर आमच्याकडे संपर्क साधावा. दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात या प्रशिक्षणाचं आयोजन होतं. वंचितांसाठी अनौपचारिक शिक्षणाच्या क्षेत्रात आधीपासून काम करत असलेल्या व्यक्ती व संस्थांना या शिबिरात सहभागी होता येतं.
खेळघराच्या आजवरच्या अनुभवातून आणि अभ्यासातून आम्ही ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ ही खेळघर हस्तपुस्तिका तयार केली आहे. महाराष्ट्रभरातल्या शिक्षक / कार्यकर्त्यांनी या पुस्तकाचं उत्स्फूर्त स्वागत केलं आहे.
खेळघराच काम हे नुसत मुला- मुलीनंबरोबरच नाहीच, सृजनशील बालकेंन्द्री शिक्षणाच्या विचारांचा हा धागा जर घरा -घरात जाऊन पोहचला तरच बदल शक्य आहे. हे जाणून सुरुवाती पासुनच खेळघरात पालाकांबरोबरच कामाला एक विशेष स्थान आहे. तरीही अनेकदा मुलीनंबरोबरच काम इतक वेढुन घेत कि पालकसंवाद राहून जातो पालकांबरोबरच काम अधिक जोरकसपण व्हावे. ते करण्यासाठी खेळघराचे कार्यकर्ते अधिक सक्षम व्हावेत. साठी २०१० पासून पालक प्रकल्पाचे काम सुरु केले.
मुलांच्या विकासात पालकांचा सहभाग व त्यांचं प्रबोधन अतिशय महत्त्वाचं आहे. यामुळेच त्यांच्याशी सतत संवाद राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी पालकभेटी व दर आठवड्याला एका गटाची पालकसभा या संवादासाठी आयोजित केली जाते.
पाचवी ते आठवी या इयत्तांमध्ये, खेळघरात मुलग्यांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे ही खंत आम्हाला सातत्याने सतावत होती. असं का होतंय याचा विचार करताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मुलग्यांना चाकोरी नको वाटते. या वयोगटातील मुलग्यांना मोकळं वातावरण, वस्तीत आणि आसपास भटकणं, खेळणं हे जास्त प्रिय असतं. या मुलांसाठी नेहमीच्या वर्गांपेक्षा अधिक सर्जनशील उपक्रम घेता येतील का या विचारांतून जून २०१९ पासून एक वेगळी बँच सुरू केली. मुलांनी तिचे नामकरण केले ‘दोस्ती गट’!
विशेषतः मुलग्यांचं जग आणि त्यांचं भावविश्व समजून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेऊन, संवादाच्या सहाय्याने विचार करून त्यातून कसा मार्ग काढता येईल ह्याची अनुभूती त्यांना देणं, हा त्या गटाचा उद्धेश आहे. त्यातूनच असं लक्षात आलं की जी मुले अभ्यास विषयात कच्ची राहतात, शाळेतून गळतात आणि ज्याचे घरात अति लाड होतात किंवा ज्यांच्याकडे अति दुर्लक्ष होतं अशा मुलांना वाईट संगत लागू शकते, ती गुन्हेगारीच्या मार्गाला जाऊ शकतात. मुलग्यांबरोबर काम करण्याची गरज इथं अधोरेखित होते.
या प्रकल्पासाठी आम्हाला सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या सर्व लोकांकडून मदत मिळते.
दहावीनंतर मुलांना सक्षमपणे आपल्या पायावर उभं राहाण्याकरता व्यवसाय शिक्षणाची शाखा निवडता यावी यासाठी मार्गदर्शन, आर्थिक मदत, मानसिक प्रश्नांवर सल्ला यासाठी खेळघरात प्रयत्न केले जातात. १६ ते २० वयोगटातल्या मुलांना वस्तीतील व्यसनं, मारामाऱ्या, गुन्हेगारी, छेडछाड यासारख्या गोष्टी आकर्षित करीत असतात. यापासून स्वतःला व मित्रांना वाचवणं मुलांना शक्य व्हावं आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्या मनात रुजावी यासाठी युवक गटात उपक्रम आखले जातात.