News not found!

कोरोनाच्या काळात खेळघरातील कामाची परिस्थिती

खेळघराच्या कामाचे updates-
१४ मार्च २०२० पासून खेळघराचे वस्तीतील वर्ग बंद झाले...खेळघर हे प्रामुख्याने मुलांबरोबर चे काम आहे...आणि तेच करायचे नाही या वास्तवाने आम्ही देदिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागलो होतो.
काय करता येईल सुचत नव्हते... या सक्तीच्या रिकाम्या वेळात काय करायचे सुचत नव्हते.
हळूहळू आम्हीदेखील इलेक्ट्रॉनिक मीडिया शी जुळवून घ्यायला शिकलो.आमच्या झूम मीटिंग सुरू झाल्या.आम्ही वार्षिक मूल्यमापन, पुढील वर्षाची आखणी, आमच्या स्वताच्या क्षमता विकासासाठी चा अभ्यास अशी कामे घरी बसून करू लागलो.
वस्तीत पालकांना ,मुलांना फोन करून वस्तीतली परिस्थिती जाणून घेत आहोत. जरूर लागेल तिथे आर्थिक मदत करणे एकवेळ सोपे होते ...पण मुलांचा शिकण्यातला रस टिकून रहावा, त्यांना या वेळात काही अर्थपूर्ण करायला मिळावे असे सातत्याने वाटत होते.
आमच्या वस्तीत फोनला चांगली range येत नाही, वायफाय सिग्नल अगदी विक असतो हा आमचा अनुभव होता. त्यामुळे स्मार्ट फोन च्या माध्यमातून काही संपर्क होऊ शकेल असे वाटत नव्हते.
शेवटी आम्ही एक प्रयत्न करून पहायचा ठरवला. आम्ही सर्व मुलांचे फोन नंबर्स मिळवायची मोहीम काढली.त्या साठी आम्हाला मुलांनी खुप मदत केली. जवळपास १६१ मुलांचे नंबर्स मिळाले .त्यातल्या ६७ जणांच्या घरी स्मार्ट फोन होते.
त्या नंतर प्रत्येक बॅच च्या वर्गताईने त्यांच्या वर्गाचा what's app groups
तयार केला.
फोन मुलांच्या आई किंवा बाबांकडे असणार.त्यांना कदाचित वाचता येणार नाही म्हणून आम्ही या
what's app
गटाबद्दल audio message
तयार करून पाठवला.पालकांना मुलांना तुमचा फोन काही वेळ वापरू द्यावा असे आवाहन केले.
गटावर आता आम्ही वेगवेगळ्या भाषा,गणित आणि कलेच्या activities
टाकू लागलो.काही मुलांना चित्रे काढायला आवडते आहे तर काहींना इतर विषयांत रस आहे.मुले त्यांनी काढलेल्या चित्रांचे ,लेखनाचे फोटो काढून आम्हाला पाठवत आहेत.ऑडियो मेसेज पण पाठवतात.स्वतःची डोकी चालवून गम्मत जममत देखील करत आहेत.मजा येते आहे ह्या संवादातून.

या पुढचा टप्पा म्हणजे आम्ही खेळ घराचे वाचनालय सुरू करायचे ठरवले.
वस्तीतील आपल्या केंद्रात आठवड्यातून दोनदा गोष्टीची पुस्तके मिळतील असा ऑडियो मेसेज what's app group
वरून पालकांना पाठवला.
काल वाचनालयाचा पहिला दिवस होता. ३६ मुलांनी carona चे सर्व नियम पाळून पुस्तके घरी वाचायला नेली....मुलांना चित्र काढायला कागद आणि रंग ही देता आले. वस्तीत राहणाऱ्या आमच्या मीनाताई आणि सुष्माताईनी या कामात पुढाकार घेतला.
बदललेल्या परिस्थितीत देखील काही प्रमाणात आपल्याला मुलांपर्यंत पोचता येते आहे हे समधान मनात आहे.

पुर्वावलोकनAttachmentSize
96377520_2916005741814376_8102169136311828480_o.jpg100.54 KB
96234036_2916005735147710_590832872517009408_o.jpg116.99 KB