News not found!
खेळघरात शिकवल्या जाणार्या विविध औपचारिक विषयांचा, त्यातल्या मूलभूत संकल्पनांनुसार आणि टप्प्यांनुसार अभ्यासक्रम ठरवणे, नि त्यातल्या पर्यायी पद्धती शिकणे हा दुसरा उपक्रम.
गणित - या तीन वर्षांत गणिताच्या कामाला गती आली. आम्ही भारतभरातल्या विविध संस्थांनी तयार केलेली गणिताची साधनं आणली. ती कशी वापरायची याची प्रशिक्षणं घेतली.
इंग्रजी - २००४ मध्ये यशोधरा कुंदाजींनी अनौपचारिक पद्धतीनं इंग्रजी विषय कसा शिकवावा याचं आमचं वर्षभर प्रशिक्षण घेतलं होतं. त्या सगळ्या साधनांची संगती लावून इंग्रजीचा अभ्यासक्रम तयार केला आहे. यावर्षी इंग्रजी विषयाची जबाबदारी वाटून घेतली आहे.
इतिहास-भूगोल या विषयासंदर्भात जमतील तेव्हा मुलांचे वर्ग घेण्याबरोबरच तायांबरोबरही त्यांनी संवाद साधला. भाषा नकाशाची, एकलव्यची सामाजिक अध्ययन पुस्तके यावर आधी काम झाले होते. आता संगती - अवेही या संस्थेच्या पाच संचांचा गटाने अभ्यास करून मांडणी झाली. मुलांच्या जाणीवांच्या विकासासाठी हे साहित्य फार महत्त्वाचे आहे.
विज्ञान - खेळघरात मुलांना विज्ञानातल्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग करून बघून समजावून घेता याव्यात म्हणून छोटीशी प्रयोग शाळा उभी केली आहे.
औपचारिक विषयांतील एकसुरीपणा व उपरेपणा जाऊन मुलं मनापासून शिकण्याकडे वळतील, आपल्या जीवनाला जोडून बघून त्यात रस घेतील यासाठी हे काम फार महत्त्वाचं आहे. पूर्वीपेक्षा औपचारिक अभ्यास विषयांची खेळघराची शाखा आता खूपच समृद्ध झाली आहे.