News not found!
आज ज्या स्वरूपात हे काम चालू आहे तसं पुढं नेणं सोपं नाही. या कामासाठी खेळघर या मुला-पालकांकडून आर्थिक मदत घेत नाही. तेव्हा आपल्या मदतीवरच ह्या कामाचं भवितव्य अवलंबून आहे.
वेळ, पैसे व कौशल्ये अशा तीन मार्गांनी आपण खेळघराला मदत करू शकता.
आर्थिक मदत
१. खेळघरातल्या एका मुलाच्या/मुलीच्या शिक्षणाची वार्षिक जबाबदारी आपण घेऊ शकता.
१ ली ते ६ वी ची मुले - रु. ८०००/-
७ वी ते १० वीची मुले - रु. १०,०००/-
१० वीच्या पुढची मुले - रु. २०,०००/-
आर्थिक मदत तुम्ही online करू शकता. त्यासाठी पुढे सविस्तर माहिती दिली आहे.
देणगीदारांना 80G ची सवलत दिली जाईल.
On Line - State Bank Of India
Palakniti Pariwar – A/c No. 35689944253
Branch - Deccan Gymkhana Pune
IFS Code - SBIN0001110
Branch Code - 01110
२. मुलांसाठी वह्या, पुस्तके, चपला, दप्तरे, स्टेशनरी अशा गोष्टींसाठी रु. २००० ते ५००० रुपयांपर्यंत देणगी देता येईल.
३. मुलांना खेळघरात आठवड्यातून दोनदा पौष्टीक खाऊ दिला जातो, त्याचा महिन्याचा खर्च रु. ६०००/- आहे. तो तुम्ही देऊ शकता.
४. मुलांसाठी खेळणी, पुस्तके, मासिके, कागद, रंगसाहित्य, शाडूची माती, मैदानी तसेच बैठ्या खेळांचे साहित्य अशी अनेक शैक्षणिक साधने आपण भेट देऊ शकता अथवा आपल्या मित्र-सृहृदांकडून जमा करून आणून देऊ शकता .
वेळ
खेळघरातल्या अनेक कामांमधे आपण मदत करू शकता.
• वाचनालयाच्या व्यवस्थेत मदत करणं
• हिशोबाच्या कामात मदत करणं
• मोठ्या खरेदीमध्ये मदत करणं
• खेळघरासाठी माणसे जोडणं
• बागकामात मदत करणं
• शैक्षणिक साहित्याची दुरुस्ती व व्यवस्था ठेवणं
• कॉम्प्युटर डाटा एंट्री करणं
• १ली, ८वी, ११वी प्रवेश प्रक्रियेमधे मदत
या कामांसाठी आठवड्यातून किमान एकदा खेळघरात येण्याची आवश्यकता आहे.
३) कौशल्ये
• खेळघरातील मुलांसाठी आपण औपचारिक अभ्यास विषय तसेच अनौपचारिक कला, खेळ इ. गोष्टी शिकवू शकता. अभ्यास विषयांमधे प्रामुख्याने मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांमधे मदतीची मुलांना गरज असते.
• संगीत, चित्र, ओरीगामी, शिल्प, नृत्य, नाट्य, पपेटस् इ. कलांमधील आपले कौशल्य आपण मुलांना शिकवू शकता.
• दुकानजत्रा, सहली, गॅदरिंग अशा मोठ्या कार्यक्रमांत मदत करू शकता.
पालकनीती परिवार
प्रयास, अमृता क्लिनिक, आठवले कॉर्नर,
संभाजी पुलाजवळ, कर्वे रोड, पुणे - ४११ ००४
Email: palakneeti@gmail.com
Website - www.palakneeti.in
खेळघर
गुरुप्रसाद अपार्टमेंट,
२३, आनंदनिकेतन सोसायटी, कर्वेनगर, पुणे - ४११०५२
फोन - ०२०-२५४५७३२८, ९८२२८७८०९६,९७६३७०४९३०.
Email: khelghar@gmail.com, palakneeti@gmail.com
Khelghar Youtube channel - https://www.youtube.com/channel/UCZznXXRHSwli5BeY6SQCrIQ/
पालकनीती परिवाराची प्रकाशने -
१) पालकनीती मासिक – (पालकत्वाला वाहिलेले) मासिक वार्षिक वर्गणी - ३०० रुपये
२) आनंदाने शिकण्याच्या दिशेने – (खेळघर हस्तपुस्तिका) – भाग १ आणि २ -६०० रुपये
३) सकारात्मक शिस्त - ७० रुपये
४) ठिपके जोडू या, भूमितीशी मैत्री करू या - ७० रुपये
(ठिपक्यांच्या कागदाचा वापर करून भूमिती समजून घेता यावी म्हणून... )
५) चौकटीचे कागद: एक अनोखे गणिती साधन - ७० रुपये
६) भाषा नकाशाची - २५ रुपये
(नकाशाच्या माध्यमातील माहिती मुलांना सहज वाचून, समजून घेता यावी म्हणून )
७) अमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम - ३० रुपये
(आमिष आणि शिक्षांच्या पकडीतून संगोपन मोकळे व्हावे म्हणून..)
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरावा.